PostImage

Sujata Awachat

Sept. 20, 2024   

PostImage

7th pay commission: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा …


7th pay commission: सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे. सध्या मिळणारा 50 टक्के महागाई भत्ता आता 53 टक्क्यांवर जाणार आहे. जानेवारी ते जून 2024 या कालावधीत AICPIच्या आकडेवारीनुसार ही वाढ जवळपास निश्चित आहे.

हे देखील वाचा: SBI Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत निघाली 1511 पदांसाठी बंपर भरती, असे करा ऑनलाईन अर्ज

2024 मार्चमध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला होता, जो जानेवारी 2024 पासून लागू झाला होता. त्याचप्रमाणे, हा भत्ता आता आणखी 3 टक्क्यांनी वाढून 53 टक्के होणार आहे. याचा निर्णय 25 सप्टेंबर 2024 ला होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाणार आहे, आणि हा भत्ता जुलै 2024 पासून लागू होईल.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा

महागाई भत्ता वाढल्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पगारा सोबत कर्मचाऱ्यांना थकबाकी रक्कम मिळणार आहे. यामुळे नवरात्र, विजयादशमी, आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. आर्थिक तंगी कमी होईल आणि या मोठ्या सणांचा आनंद ते भरभरून लुटू शकतील.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.